पुणे,दि.२५:-पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र हिवसे यांनी हा आदेश दिला. कोर्टात दाखल झाला व समता तत्वांच्या कारणांवरुन जामिनाची मागणी अनिल भोसले यांनी केली होती. याला मूळ फिर्यादी व गुंतवणुकदारांचे वकील सागर कोठारी आणि सरकारी वकील विलास पठारे ह्यांनी विरोध केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अनिल भोसले यांचा जामिनाची मागणी फेटाळून लावली.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवाहर प्रकरणी आमदार अनिल भोसले यांनी विशेष न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादी व गुंतवणूकदारांचे वकिली सागर कोठारे यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले, भोसले यांनी एकाच वेळी मुंबई उच्च न्यायालय आणि विशेष न्यायालय, पुणे येथे जामिनाचा अर्ज केल्याची माहिती दोन्ही न्यायालयांपासून लपवून ठेवत न्यायालयाची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आणून
देत भोसले यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. न्यायालयाने कोठारी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन अनिल भोसले यांचा जामीन फेटाळून लावला.