धर्माबाद,दि.०१:- आर्य वैश्य समाजाची कुलदैवता वासवी कन्यका परमेश्वरी मातेची जयंती प्रतिवर्षाप्रमाणे धर्माबाद शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
सकाळी आठ वाजता वासवी माता पुराण पोथीचे पारायण व सकाळी दहा वाजता कुंकुंमअर्चना पूजा करण्यात आली यासाठी सौ.राधा गंगमवार,सौ.अमृता चक्करवार,सौ.सारिका रुद्रावार, सौ.सुप्रिया कामिनवार,सौ.मंगल चिद्रावार,सौ.अनिता सोमशेटवार यांच्यासह वैश्य समाजातील सुमारे शंभर महिला उपस्थित होत्या.
सायंकाळी सहा वाजता डाॅ.उत्तम चक्करवार यांचे हस्ते पालखीचे पूजन करुन शहरातील प्रमुख मार्गांनी वासवी मातेच्या भव्य तैलचित्रासह व पालखीसह आकर्षक देखाव्यासह विलोभनिय मिरवणुक काढण्यात आली.धर्माबाद शहरामध्ये ठीक ठीकानी सुंदर रांगोळी व फटाक्याची नयनरम्य आतिशबाजी करण्यात आली.महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ.उत्तम चक्करवार,संजय कोंडावार,सुरेश येरावार,परेश चिंतावार,सखाराम मुक्कावार,साईनाथ कामिनवार,सतिश कोटगीरे,राजेश्वर गादेवार,साईप्रसाद पेकमवार,विनय गादेवार यांच्यासह आर्यवैश्य सर्व समाज बांधव कार्यकारणीतील सर्व पदाधिकार्यासह सर्व सदस्यानी परिश्रम घेतले.
सिध्देश्वर मठपती- धर्माबाद प्रतिनिधी