अहमदनगर,दि.०४ :- कोतवाली पोलिसांतर्फे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी टवाळखोरांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. रात्री उशिरा बस स्थानक परिसरात तसेच शहरात इतर ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाईच्या धडाका पोलिसांनी सुरू केला आहे. रात्री अपरात्री विनाकारण फिरत असलेल्या मोटरसायकल चालकांना अडवून कोतवाली पोलीस चौकशी करत आहेत. गुरुवारी रात्री (ता.४) पुणे बस स्थानक परिसरात उघड्यावर दारू पिणाऱ्या काही जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चौका- चौकात रात्री उशिरा फिरणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. गुन्हेगारांकडे चाकू, तलवार अशी हत्यारे असतात. त्याचा धाक दाखवून ते लुटमार करतात. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे हद्दीतील परिसरात तसेच बस स्थानक परिसरात रात्री उशिरा विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. गेल्या आठवड्यात कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरा शहरातून वाहन घेऊन जाणाऱ्या इसमाकडून तलवार जप्त केली होती. माळीवाडा बसस्थानक, पुणे बसस्थानक व इतर चौकात रात्री विनाकारण मोटरसायकली वरून फिरणाऱ्यांना अडवून कोतवाली पोलीस चौकशी करत आहेत. वाहनांचे नंबर पोलिसांकडून तपासले जात आहेत. या शोध मोहिमेत पोलिसांना काही जबरदस्तीने मोबाईल चोरणारे मारहाण करून लुटणारे गुन्हेगार सुद्धा हाती लागले आहेत. संशयितरित्या फिरणाऱ्या तीन चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मोबाईल हिसकावणारा एक इसम पोलिसांनी अटक केला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे स्वतः आपल्या अधिकारी आणि पोलीस जवान यांच्यासह रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत आहेत.
…………………………..
रात्री ११ नंतर उघड्या ६२ आस्थापनांवर कारवाई
दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या रात्री ११ नंतर उघड्या दिसल्यास कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ६२ लहान मोठ्या आस्थापनांवर कोतवाली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यानंतरही रात्री अकरानंतर दुकाने खुली ठेवल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
………………
महिला, सर्वसामान्यांकडून कारवाईचे स्वागत
कोतवाली पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात आल्याने महीला तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी झाला असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी कोतवाली पोलीस प्रयत्न करीत आहेत.
………………
विनाकारण त्रास देणाऱ्यांची माहिती द्या : पोलीस निरीक्षक यादव
आपल्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी विनाकारण रात्रीच्या वेळेस गोंधळ घालणारे, दारू पीत बसणारे अथवा इतर बेकायदेशीर गोष्टी करणाऱ्यांबाबत माहिती द्यावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र पिंगळे विवेक पवार गजेंद्र इंगळे मनोज कचरे मनोज महाजन सुखदेव दुर्गे पोलीस जवान योगेश भिगारदिवे अतुल काजळे अमोल गाडे सोमनाथ राऊत सुजय हिवाळे रियाज इनामदार तनवीर शेख गणेश धोत्रे संदीप थोरात प्रमोद लहारे कैलास शिरसाठ अभय कदम सलीम शेख अनुप झाडबुके ईश्वर थोरात राहुल शेळके सुमित गवळी अशोक कांबळे शरद धायगुडे राजेद्र पालवे बिल्ला इनामदार अशोक भांड अशोक सायकल शरद धायगुडे प्रशांत बोरुडे बोरुडे यांनी केली आहे