पिंपरी चिंचवड,दि.०४:-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी महानगरपालिकेच्या दांडी बहाद्दर २३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ” जोर का झटका ” आज सायंकाळी ६ वाजता दिला असून स्थापत्य, आरोग्य, पाणी पुरवठा, वैद्यकीय असा अनेक विभागातील २३५ दांडी बहादर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश संबंधित विभाग प्रमुखांना दिल्याने पिंपरी चिंचवड पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या तपासणी
पथकाने १८ जानेवारी २०२३ रोजी महापालिका प्रशासकीय इमारत व इतर विभागात तपासणी पथकाने अचानक तपासणी करून विभाग प्रमुखांची परवानगी न घेता तसेच पूर्व कल्पना न देता ” दांडी मरणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अहवाल तयार केला. हा अहवाल आयुक्त श्री शेखर सिंह यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी दांडी बहादर यांना ना चाप बसावा या उद्देशाने महापालिकेच्या विविध विभागाच्या २३५ अधिकाऱ्यांच्या विरोधी कारवाई करण्याचे आदेश महापालिकेचे सह आयुक्त सामान्य प्रशासन श्री वामन मेमाणे यांच्या मार्फत आज सांयकाळी ६ वा काढल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.