पुणे दि २६ : –लोहमार्ग पुणे हद्दीत २ वर्षापुर्वी आरोपी यांनी केलेल्या गुन्ह्याला गुन्हे शाखेने वाचा फोडली असून त्याच्याकडून चोरीच्या ६ दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
नोयल शबान (क्वीन्स गार्डन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे, तर रेल्वेत चोरी केल्यानंतर त्याचा वाटा साथीदाराने व्यवस्थित न दिल्याने त्याचा खून करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुरज नादर याचा त्याने खून केला होता.
गुन्हे शाखेच्या युनीट २ चे पोलीस कर्मचारी व अधिकारी पुणे स्टेशन परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी यशवंत खंदारे व मोहसीन शेख या दोघांना त्यांच्या बातमीदारामार्फत नोयल शबान हा रेल्वे स्थानक परिसरात वाहनचोरी करता टेहळणी करत फिरत आहे. त्यानुसार त्यांनी तपाहणी केली. तेव्हा तो रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरित्या वाहनांची टेहळणी करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन युनीट २ च्या कार्यालयात आणून पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिवासी प्रशिक्षण संस्थेच्या सीमा भिंतीच्या बाजूला लपवून ठेवलेल्या ६ दुचाकी काढून दिल्या. त्याच्याकडून बंडगार्डन २, येरवडा २, चतुश्रृंगी १, खडकी १ असेसहा गुन्हे उघडकिस आणण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी करत असताना पोलीस नाईक खंदारे यांना शाबान याने कोरेगावर पार्क रेल्वे ओव्हरब्रीज खाली एकाचा खून केल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केल्यावर सुरज नादर हा त्याचा साथीदार पाटील इस्टेट भागात राहात होता. त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये रेल्वेत एक बॅग चोरली होती. त्यात त्याने मिळालेले पैसे वाटणी करत असताना त्याचा वाटा व्यवस्थित दिला नव्हता. त्यामुळे त्यांची कोरेगाव पार्क रेल्वे ओव्हरब्रीजखाली भांडणं झाली होती. त्यात नोयल याने सुरज नादर याला मारहाण करून त्याचे डोके पटरीजवळील असलेल्या सीमेंट कट्ट्यावर जोरजोरात आपटून त्याचा खून केला. त्यानंतर याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानान पवार, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, जयंवंत जाधव, सहायक पोलसी फौजदार संजय दळवी, अनिल उसुलकर, शेकर कोळी, कर्मचारी अजय खराडे, विनायक जाधव, यशवंत खंदारे, राकेश खुणवे, विवेक जाधव, चंद्रकांत महाजन यांच्या पथकाने केली.