परळी दि,२३ :- परळी तालुक्यात पहिल्यांदाच चारा छावणी, दुष्काळावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांचे खरे पशुधन वाचवण्यासाठी गेल्या 36 दिवसापासून छावणी सुरू केली आहे. पंचकृषीतील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी आपली सर्व जनावरे छावणीमध्ये दाखल केली होती. अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांना व जनावरांना सर्व सोईसुविधा पदरमोड करून जागा, पाणी व सावली, चारा व्यवस्था करून दिली. शासनाच्या अनागोंदी अनुदानाची जास्त अपेक्षा न ठेवता छावणी चालू झालेल्या दिवसांपासून आजपर्यंत सर्व जनावरांना तुटपुंजे, तंतोतंत
किलोवरच चारा मोजून न देता सढळपणे, दरवेळी हिरवा चारा उपलब्ध केलेला आहे. वेळोवेळी भाऊ छावणीत जास्त वेळ उपलब्ध राहून सर्व शेतकऱ्यांची आपलकीने विचारपूस करून जनावरांच्या अडी-अडचणी सोडवताना नेहमीच दिसतात. छावणीमधून कसलाही नफा न कमावता, ना नफा ना तोटा या धोरणाप्रमाणे समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, अशा भावनेनेच छावणी चालवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन वाचले तर आहेच परंतु अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांची प्रकृती घराच्यापेक्षा जास्त सुधारलेली आहे.
भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना आधार देणारे शेतकऱ्याचे खरे कैवारी. फुलचंदभाऊ कराड
Your Content Goes Here