पुणे दि,२५:- संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे शहरात मार्गाची सर्व माहिती वाहनचालकांना मिळावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी या वर्षी वेबपेज तयार केले आहे. यामुळे वाहनचालकांना पालखी दरम्यान बंद असलेले रस्ते, वाहतुकीसाठी खुले असणारे रस्ते पालखीचा मुक्काम याची माहिती वाहन चालकांना मिळणार आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वाहतूक शाखेने तयार केलेल्या वेबपेजचे नाव https://changebhai.in/palkhi2019/ असे नाव आहे. पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी (२६ जून) होणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुणे शहरात एकत्र येतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते .ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी एक वेब पेज तयार केलेले आहे. वाहनचालकांना याचा नक्कीच फायदा दि,२६ रोजी पुणे शहरात पालखी दरम्यान मदत होणार आहे. तसेच पुणे शहरात २ व्हीलर व फोर व्हीलर गरज असल्यास यांचा वापर पुणे शहरात करावा असे आवाहन पुणे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.
https://changebhai.in/palkhi2019/