पुणे दि १७: – पुणे उंड्री परिसरातून एका नायजेरियन इसमाकडून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. उंड्री परिसरात एक नायजेरियन इसम कोकेनसारख्या अंमली पदार्थाची तरुण-तरुणींना विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना मिळाली. मा. डॉ. श्री. वेंकटेशम पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या निर्देशानुसार या संदर्भात अधिक माहिती प्राप्त करून श्री. रवींद्र शिसवे, पोलीस सह. आयुक्त, श्री. अशोक मोराळे,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शिरीष सरदेशपांडे पो. उप. आयुक्त, गुन्हे, श्री. अमीर शेख, सहा. पो. आयुक्त, गुन्हे-१ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरी. श्री. विजय टिकोळे यांच्या अधिपत्याखाली दि. १७ रोजी पुणे उंड्री परिसरात सापळा रचून एका शोलाडॉये सॅम्युअल जॉय, वय ४४, रा. उंड्री, पुणे या नावाच्या नायजेरियन इसमास पकडले. त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे रोख रक्कम ३ लाख ६८०८९ रुपये सापडली. व ७३३ ग्रॅम कोकेन पावडर, ८७ लाख,९६, हजार रुपये. किमतीची व २४ हजार किमतीचे पाच मोबाईल फोन, ९० हजार रुपये. किमतीची तीन घड्याळे, डिजिटल वजनकाटा व कोकेन पावडर बांधण्यासाठी असलेल्या प्लास्टिक पिशव्या कि. रु. १ हजार असा एकूण ९१, लाख ७९,०७०/- रु. किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. आहे त्याच्याकडे चौकशी करता तो पुणे शहर परिसरात, एनआयबीएम रोड, उंड्री येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कोकेनची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याला मदत करणाऱ्या साथीदारांचा शोध पुणे पोलिस करीत आहे.हि कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. विजय टिकोळे यांच्या अधिपत्याखाली पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, मोकाशी,राहुल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छडीदार, योगेश मोहिते यांनी केली.