पुणे दि,१७ :- नृत्यांजली संस्थेतर्फे आयोजित केलेल्या “ओजस नृत्यमहोत्सवात” संप्रदा भुजबळ यांना “नृत्य ओजस्वी” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नृत्यगुरू डॉ, जी, रतीश बाबू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी नृत्यगुरु राजसी वाघ, अंजली सांगोले तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.भारतीय शास्त्रीय नृत्य हा परिपूर्ण व्यायाम असून
आरोग्यपूर्ण जीवनासाठी नृत्य आवश्यक आहे, नृत्य ही जीवनाची परिभाषा असून सफल संपूर्ण जीवनासाठी नृत्य व त्यात सातत्य राखणे गरजेचे आहे, असे मत रतीश बाबू यांनी पुरस्कार वितरणा नंतर बोलताना सांगितले.संप्रदाने यावेळी भरतनाट्यमवर आधारित एकल नृत्य प्रकारात पद्मम हा नृत्याविष्कार सादर केला, त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात विविध राज्यातून आलेले १५० हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.