निरा नरसिंहपुर दि १८ :- प्रतिनिधी. पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये टाळ आणि मृदुंगाच्या आवाजात दहीहंडी फोडून मेघ राजाला विनंती केली दुष्काळाच्या तीव्रतेने पशु पक्षाचे मुक्या प्राण्यांचे मनुष्याचे आतिशय हाल होत असल्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही मुक्या प्राण्यांसाठी चारा नाही ही अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे भाविकांमध्ये हे नाराजी व्यक्त होत आहे प्रत्येक गावोगावी देवाचे नामस्मरण करून देवाला साकडे घालून मेघराजा गडगडून पडू दे आणि बळीच राज्य येऊ दे हीच विनंती करून टाळ-मृदंगाच्या आवाजाने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर याठिकाणी भाविकांच्या वतीने करण्यात आला या ठिकाणी बहुसंख्य वारकरी महिला एकत्रित येऊन विठ्ठलाला व महादेवाला विनंती केली व साकडे घालून नामाचा जयघोष करून त्या मेघराजाला विनंती केली पाऊस पडला तर शेतकरी राजा सुखी होईल आणि मुक्या जनावराला चारा पोटासाठी निर्माण होऊन त्यांची शांतता होईल अशाप्रकारची विनंती करून परमेश्वराला शिव शंभू महादेवाला विठ्ठलाला या पिंपरी नगरीमध्ये विठ्ठलाच्या मंदिरांमध्ये साकडे घालून दह्या दुधाचा भरलेली माठ दहीहंडी फोडून नामस्मरणाच्या जय घोष केला या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत बापू बोडके यांनीही उपस्थितीत राहून कार्यक्रमाला शोभा आणली विणेकरी पोपट सुतार मृदंग वादक महादेव सुतार शिवाजी बोडके संदिपान पडळकर भारत बोडके आणिल लावंड अरुण शेंडगे सोमनाथ चौगुले दत्तात्रेय बोडके सुमन ताई मगर सुमन चौगुले महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विठ्ठला मंदिरांमध्ये नामाचा जयघोष करून मेघ राजाला विनंती केली
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी