पुणे ग्रामीण दि १३ : – माळेगाव, तालुका बारामती आणि सासवड पोलीस स्टेशन हद्दीत ऑनलाईन बिंगो ऑनलाईन मटका मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या गोपनीय माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली होती व यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीस जवान यांनी नियोजन करून माळेगाव, ता बारामती येथे एका ठिकाणी आणि एकाच वेळी. पि.एम.टि. बस स्टँड, सासवड येथे 4 ठिकाणी छापा मारला असता या पथकाने धाड टाकून सुमारे २ लाख 6,830 रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे व 9 जणांना अटक केली आहे. ही कारवाई माळेगाव, तालुका बारामती आणि सासवड पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली.होती याबाबत खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्यास सांगितले होते.व माळेगाव, तालुका बारामती आणि सासवड या ठिकाणी कारवाई केली आहे व सदर कामगिरी ही,.संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा).जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक,विजय वाघमारे, जेजुरी पो स्टे बारामती क्राईम ब्रँच चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. दशरथ कोळेकर,पो.कॉ. विशाल जावळे,पो.कॉ. शर्मा पवार,तसेच,अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक, सहा पो निरीक्षक राहुल गुघे,पो ना भरत आरडे, भाऊसाहेब खाडे, यांनी छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 97,150= रोख रक्कम
2) 1,09,680= मोबाईल, 4 कॉम्प्युटर संच, 4 LCD स्क्रीन, CCTV DVR, टेबल, खुर्ची व इतर साहित्य.
असा सुमारे 2,06,830 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच 9 आरोपीना अटक करण्यात आली.आहे व पुढील तपास सासवड पो स्टे करीत आहे