मुंबई दि २८ :-आज दि २८ हीच ती वेळ ! @६:४४ मिनिटे ; शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार आज दि २८ रोजी स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आघाडीच्या फॉरर्म्युल्यात ठरल्याप्रमाणे शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई,
बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी देखील मंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. तर राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांनि शिवाजी पार्कमध्ये गर्दी केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे, उद्योजक मुकेश अंबानीची यांच्या पत्नी नीता अंबानी यांची उपस्थिती लक्षणीय होती.या व्यासपीठावर तब्बल तीनशेहून अधिक जणांची आसनव्यवस्था करण्यात आली होती.
गेल्या अनेक दिवसांच्या सत्ता संघर्षानंतर आज राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह इतर ६ नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथग्रहण केली.राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहिला मिळत होता