पुणे :- दि ०३ :- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी.ए. इनामदार आय.सी.टी. अॅकॅडमी संचालित कॉम्प्युटर हार्डवेअर , मोबाईल रिपेअरिंग कोर्सच्या यशस्वी शालेय विद्यार्थ्यांचा मंगळवारी झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला .युसुफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.आबेदा इनामदार,तनवीर इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते , अध्यक्षस्थानी डॉ.पी. ए. इनामदार होते.
या शैक्षणिक कॉम्प्युटर हार्डवेअर , मोबाईल रिपेअरिंग कोर्स च्या ३३४९ विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्यात आले. अँग्लो ऊर्दू गर्ल्स हायस्कूल, इंग्लिश मिडीयम स्कूल, अँग्लो ऊर्दू बॉईज हायस्कूल, पैं परवाझ विशेष तुकडीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी त्यात सहभागी झाले या कार्यक्रमात बालवाडी, के.जी., पहिली ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांनी अॅपल फोन दुरुस्ती, टॅब, कॉम्प्युटर दुरुस्तीची प्रात्यक्षिके दाखवली. आणि उपस्थित थक्क झाले. या प्रात्यक्षिकात जुवेरिया युसुफ खान, उमर शेख, आफरिन पठाण, आशरिया शब्बीर खान या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या प्रात्यक्षिकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘डॉ पी. ए .इनामदार आय. टी. स्पेशल अवॉर्ड’ देवून गौरविण्यात आले.
पी.ए. इनामदार आय.सी.टी. अॅकॅडमीच्या संचालक मुमताझ सय्यद यांनी प्रास्ताविक केले.डॉ. ऋषी आचार्य,उपस्थित होते. अंजुम काजळेकर, आसिफा वाधवान यांनी सूत्रसंचालन केले.
हे प्रशिक्षण विधाथ्र्यांना ३ महिन्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. या कार्यक्रमात सोहेल सिद्दीकी ( अल इत्तेहाद एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबई ), शबाना सय्यद, परवीन शेख, रुमाना शेख, आयेशा शेख,रबाब खान , अरिफ सय्यद उपस्थित होते.
मतीन दिवाण यांनी या प्रशिक्षणाचे कौतुक केले. ‘ हा प्रशिक्षण प्रकल्प दिशादर्शक असून देशभरात त्याचे अनुकरण केले जाईल. ‘ असे त्यांनी सांगितले.आबेदा इनामदार म्हणाल्या, ‘ आज मोबाईल, टॅब, संगणक दुरुस्ती करणारे विद्यार्थी भविष्यात ड्रोन, विमाने, क्षेपणास्त्रे बनवतील, अशी स्वप्ने आम्ही पाहत आहोत. तसे प्रगतीला पूरक वातावरण आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये तयार केले आहे. ‘
डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ” शैक्षणिक, आर्थिक मागास समाजात उमेद जागवून त्यांना जिंकण्याचा, प्रगतीचा आत्मविश्वास देण्याचे काम आम्ही करीत आहोत. आताच्या शिक्षण पध्दतीत प्रमाणपत्र देण्यावर भर दिला जातो, मात्र, आमच्या कँपस मध्ये आत्मविश्वास, उमेद देण्यावर भर दिला जातो आहे. संगणक तंत्रज्ञान, इंग्लीश संभाषण देण्याचे काम आम्ही राज्यातील ८0 शाळांमध्ये विनामूल्य करीत आहोत. पुढील पिढयांना आनंदात ठेवायचे असेल तर या पिढयांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. सुट्ट्या न घेता , आळस न करता हे कर्तव्य पार पाडले पाहिजे. देशात हे प्रशिक्षण कोठेही दिले जात नाही. पण, तसे स्वप्न पाहिले पाहिजे.’