पुणे दि०३ : पुणे महापालिकेत सभागृहनेते पदी धीरज घाटे तर स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड झाली आहे.
आरक्षण बदलल्यावर मुरलीधर मोहोळ यांची महापौर पदावर निवड करण्यात आली. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांनाही पक्षाने राजीनामे देण्यास सांगितले.होते त्यानुसार सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि नुकतेच आमदार झालेले स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी राजीनामे दिले. त्यानंतर घाटे आणि रासने यांची निवड करण्यात आली. दरम्यान घाटे हे भाजपचे आक्रमक सभासद म्हणून ओळखले जातात.सभागृहात अतिशय स्पष्ट मांडणी करणारे घाटे अत्यंत कमी वयापासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. घाटे यांना सभागृहनेते पदी बढती देऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.दुसरीकडे रासने काहीसे मवाळ असले तरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या माध्यमातून त्यांच्यामागे मोठी युवा आणि व्यापारी वर्ग आहे. भाजपचे ज्येष्ठ सभासद म्हणून त्यांनाच स्थायी समितीवर संधी मिळेल असे अपेक्षित होते.