पुणे दि ०३ :-दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आणि माहिती अधिकारांचे उल्लघनासंदर्भात अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे निवेदन दिव्यांग दिन, ३ डिसेंबर रोजी अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांना दिले .
दिव्यांगांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात तसेच माहिती अर्जांचे संकलन माहिती अधिकाराखाली करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यास माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दिव्यांग कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे . प्रकाश निकम, डॉ. संजय जोशी, अरूण औचरे, अतुल जोशी, विलास निकम, बबन निकम,शैलेश हेंद्रे,मंगेश निकम , विशाल सुर्वे, पूनम हेंद्रे, स्वप्नील जोशी यांनी हे निवेदन दिले.
निलेश निकम हे ४ ऑकटोबर २०१८ पासून निलेश निकम हे दिव्यांग समस्या ,प्रलंबित प्रश्न ,अर्ज यांची चौकशी करणारे किती अर्ज माहिती अधिकाराखाली आले ,माहिती दिली का ,याची माहिती संकलित करण्याच्या हेतूने माहिती अधिकाराखालीच पाठपुरावा करीत होते .२००५ ते २०११ कालावधीतील माहितीच या कार्यालयाकडे उपलब्ध नाही अशी धक्कादायक माहिती त्यांना मिळाली . शासनाच्या कोषागारात त्यान्वये भरणा झाला कि नाही या विषयाची माहिती रीतसर मागत होते . मात्र ,माहिती न मिळाल्याने आणि उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी अपील केले . त्यांनतर अर्धवट स्वरूपाची माहिती देण्यात आली .अनेक माहिती अर्जांचे चलनाचे पैसे न भरता माहिती दिल्याने शासनाचे कोषागाराचे किती चलन बुडाले ही माहिती दडवली जात आहे .ही शासकीय सेवेत झालेली कुचराई असून त्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी ,दिव्यांग कल्याण कार्यलयातील जनहित माहिती अधिकाऱ्यांकडून , अर्जदारांकडून बुडीत महसुलाची वसुली करावी ,अशी मागणी निलेश प्रकाश निकम यांनी पत्रकाद्वारे केली आहे .