नीरा नरसिंहपूर दि ०३ :- गणेशवाडी ( ता इंदापूर ) येथे विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात करण्यात आली. माहेरवाशिंनीच्या डोक्यावर तांब्याचे कलशाची मिरवणूक गावातून काढण्यात आली. त्यानंतर कलशारोहण करण्यात आले. त्यानिमीत्ताने बंडातात्या कराडकर महाराज यांचे किर्तन झाले.गणेशवाडी ( ता इंदापूर ) ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा,
कलशारोहण आज संपन्न झाले. गावातील पाच जोडप्यांच्या हस्ते महाअभिषेक व होमहवन करून मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच किर्तनानंतर कलशारोहण करण्यात आले. या निमित्ताने आलेल्या भाविक भक्तांना व ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तर बंडातात्या कराडकर महाराज यांच्या हस्ते व माहेरवाशिनी लेकी व जावई, ग्रामस्थ तसेच पुणे व सोलापूर जिल्ह्यातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत कलशारोहण उत्साहात संपन्न झाले. यानिमित्ताने गावात सर्वांनीच घरावर गुड्या उभारून घरासमोर रांगोळी काढली होती.
चौकट
विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण व गाथा पारायण सोहळ्याचे निमित्ताने मंदिराला मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसर व गाव उजळून निघाला आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रविण माने यांनी पाच लाखांचा निधी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सप्ताहास भेट देवून एक लाख एक हजार रुपये देणगी दिली. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी