पुणे दि ०७ : – पुणे विभागीय शिक्षण संचालक कार्यालयातील शिपायाला अ ऑंटी करप्शन विभागाने २६ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. आज दि०६ रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. अतिरीक्त विषय मंजुरीचे काम उप संचालकांकडून करून देण्यासाठी लाच घेतली.राजु पोपट खांदवे (वय ३१) असे लाच घेताना पकडलेल्या शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु खांदवे हा येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिपाई आहे. यातील तक्रारदार यांचे अतिरिक्त विषय मंजुरीचे काम विभागीय उपसंचालक कार्यालयात प्रलंबित होते. ते काम विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून करून देण्यासाठी खांदवे याने तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली.होती व
याबाबत तक्रारदार यांनी ऑंटी करप्शन विभाग कडे तक्रार केली होती.या तक्रारीची पडताळणी ऑंटी करप्शन विभाग यांनी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सापळा कारवाई दुपारी बंडगार्डन परिसरात खांदवे याला तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती २६ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील बिले, ला.प्र.वि. पुणे हे करत आहे सदर कारवाई पोलीस उपआयुक्त पोलिस अधीक्षक राजेंद्र बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली आहे व शासकीय लोक सेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालय हेल्पलाईन क्रमांक १०६४ संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्र बनसोडे पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली