मुंबई दि ०७ : -समाजसेवक अशोक दुबे यांची आँल इंडिया फिल्म एम्प्लॉईज कांफेडरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.साकीनाका येथील प्रसिद्ध हॉटेल मध्ये तीन दिवस चाललेल्या या बैठकीत चेन्नई, कोलकता, मुंबई, केरळ, कर्नाटक या राज्यातून जवळपास १० लाख सदस्य अणि रिजनल पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चित्रपट सृष्टीतील कामगारांच्या अनेक समस्या विषयी त्यांनी लढा दिला, तसेच त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून वेळोवेळी पाठपुरावा केला. कोणत्याही कामगारास अडचणी आल्या तर त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. कामगारांसाठी आरोग्य विषयी हेल्थ पॉलिसी काढून दिल्या. तसेच त्यांनी आपल्या प्रभागात ते नेहमी अग्रेसर राहून विविध सामाजिक, कला, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांची आँल इंडिया फिल्म एम्प्लॉईज कांफेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने युवा समाजसेवक भाई यादव, सतेज अनभुले, सनी सिंघ यांनी जाऊन त्याचे अभिनंदन केले. आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.
बाळू राऊत मुंबई उपनगर प्रतिनिधी