पुणे,दि.०८: -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज लोहगाव विमानतळ येथून वायुसेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.
यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री छगन भुजबळ, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ,उपमहापौर सरस्वती शेंडगे, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयसवाल, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, एअर कमोडोर राहूल भसीन, लेफ्टनंट जनरल सतींदर कुमार सैनी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच जयंत येरवडेकर, धिरज घाटे, राजेश पांडे, हेमंत रासने, दिपक मिसाळ उपस्थित होते.
देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवस पुण्यात होते.