पुणे -दि.०८:-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे,नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,पिंपरी चिंचवड तेली समाजाचे पदाधिकारी दिलीप चिलेकर, पोपटराव पिंगळे,बाळासाहेब शेलार,राजेंद्र शिंदे,नितीन जगनाडे,शेखर करपे,सतिश कहाने,शिवाजी अंबिके,अनिल राऊत,कैलास शेजवळ,राजेश डोंगरे,संजय जगनाडे,प्रकाश घाटकर,अमित शिंदे,निंबा चौधरी,विजय रत्नपारखी,रविंद्र हारकूलकर,महेश देशमाने, दत्तात्रय शेलार,अनिता गायकवाड,ज्योती तेली,सविता करपे आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.