कळब दि ३० : – राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी द्यावी, या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली
“दार उघड उद्धवा दार उघड”
अशी हाक देत भाजपाचे राज्यभरात घंटानाद आंदोलन”
भारतीय जनता पार्टी कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे,अल्पसंख्याक प्रदेश कार्यकारीणी सदस्य मिनाज शेख,अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष सतपाल बनसोडे,कळंब शहरातील प्रसिद्ध व्यापारी शेरू कोमटवार,भाजप युवा नेते प्रशांत लोमटे,डिकसळ ग्रामपंचायत सदस्य गणेश त्रिवेदी,शितल चोंदे,सुजित लिमकर, जीवा कुचेकर यांच्या उपस्थितीत डिकसळ येथील श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले…..
उस्मानाबाद प्रतिनीधी :- इम्रान मुल्ला