पुणे दि.:-२६ पुणे रेल्वे स्टेशन येथे मुंबई बाजुकडील जाणाऱ्या रोडवरील घोडा सायडींग रनिंगरूम समोरील सार्वजनिक ठिकाणी पुणे दि,२६ रोजी १२:३० वाजता लोहमार्ग पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक, गौड, पो. हवा, संतोष लाखे, माधव केंद्रे, संजय सोनवणे, पो. ना. गणेश शिंदे, अशोक गायकवाड, गंगाधर इप्पर, कैलास जाधव,श्रीकांत बोनाकृती असे गुन्हेगार शोध गस्तकामी असताना त्यांना नमुद इसम हा संशईतरित्या वावरताना आढळून आला. संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता न थांबवता पुढे निघुन जात असताना त्यांनी तिचा पाठलाग करुन थोडयाच अंतरावर थांबवली असता त्याच्या कडे त्याची अंगझडतीत घेतली आसताना चरस अंमली पदार्थ एकुण ७ किलो ६०६ ग्रॅम १७ पॅकेटमध्ये मिळुन आले. त्याची किंमत
अंदाजे दोन लाख ,७४,२२०/- रू. अशी आहे.बेकायदेशी अंमलीपदार्थ स्वत:जवळ बाळगल्याने त्याचेवर पुणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता.हरीराम सोनी वय ३४ वर्षे, धंदा मंजूरी, राह कोटला पलाच ४/१३, कुल्लु,हिमाचलप्रदेश असे असल्याचे सांगितले. अंदाजे दोन लाख,७४,२२०/-रुपये किंमतीचा माल पंचनाम्याने जप्त करुन ताब्यात घेतला असुन पोलीस ठाणेत गुन्हा पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गु.र.नं १२०८/२०१९ एनडीपीएस. ॲक्ट कलम 8C, 20 (8) IIA, 29अन्वये गुन्हा दाखल केला आहे आरोपीस मा.न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड ०४/११/२०१९ रोजी पर्यंत घेवुन अवैध धंद्याचे चरस अंमली पदार्थ कोठून आणला आहे. कोठे घेवुन चालला होता. कोणाला देणार होता. या मध्ये आणखीन कोण कोण आहेत याचा तपास पुणे लोहमार्ग पोलीस पोलिस करीत आहोत.सदरची कामगिरी सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुरेशसिंग गौंड, पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे हे करत असून मा. पोलीस अधीक्षक, श्री. साकोरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती नेरकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग पुणे विभाग श्री. नरेंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली करीत
आहेत